पिंपरूड येथे दिव्यांग विद्यार्थांना सायकल वाटप

468d7857 ce18 492f 8040 46f1f6dd941d

 

फैजपूर (प्रतिनिधी) भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम यांच्या मार्फत भारत सरकारच्या एडीआईपी योजने अंतर्गत येथील दोन अपंग विद्यार्थ्यांना नुकतेच सायकल वाटप करण्यात आले.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग , भारत सरकार द्वारा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम यांच्या मार्फत भारत सरकारच्या एडीआईपी योजने अंतर्गत येथील अपंगाना नुकतेच सायकल वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्या किरण कोल्हे यांचे विशेष सहकार्य लाभले. पिंपरुड येथील पुष्पलता सुनिल जंगले (वय11) राहुल रामा सुरवाडे (वय 14) हे दोघे पायाने अपंग असल्याने त्यांना शुक्रवारी पिंपरुड येथे मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. कोल्हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. तसेच दशामाता ग्रुपच्या साह्याने गोरगरिबांची मदत करत असतात. परिसरातील दिव्यांग बांधवाना सायकल हवी असल्यास खा. रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, असेही किरण कोल्हे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास सरपंच नंदू चौधरी, सदस्या डिंपल चौधरी, जयश्री पाटिल, जनाबाई सुरवाडे, डोंगर चौधरी, कमलाकर जंगले, भागवत पाटिल, हरिष चौधरी व दशामाता ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content