निपाणे येथील घटनेचा समता सैनिक दलातर्फे तीव्र निषेध

पाचोरा  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | निपाणे ता. पाचोरा येथील दलित समाजाच्या वयोवृध्द महिलेचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करणाऱ्या जातीयवादी गावगुंड यांच्यावर दाखल झालेल्या अट्रोसिटी ॲक्टसह इतर कलमाखाली गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करावी. अन्यथा समता सैनिक दल पाचोरा तालुका शाखेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन आज शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांना देण्यात आले.

महात्मा फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारांच्या महाराष्ट्रमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणे ही दुदैवी बाब आहे. अशा या घटनेचा सर्व समाज माध्यमातून जाहीर निषेध होत आहे. अशा प्रवृतीच्या जातीयवादीना  पोलिसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा समता सैनिक दल तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व जो कोणी राजकीय पक्ष किंवा नेता सबंधित जातीवादींना आषय देईल त्यांना देखील येत्या निवडणूकीत धडा शिकविण्यात येईल ही देखील बाब लक्षात घ्यावी व होणाऱ्या परिणामास संबधित प्रशासन जबादार राहील. असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर पाचोरा शहरातील प्रमुख सामजिक क्षेत्रातील पदाधिकारी, मा. नगरसेवक अशोक मोरे, शशिकांत मोरे, आर. पी. आय.चे शशिकांत मोरे,  बामसेफचे विलास पाटील यांच्या सह्या आहेत.

Protected Content