अमोल पाटील यांचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा नेते अमोल चिमणराव पाटील यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

शहरातील मोठा महादेव चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त पारोळा येथे जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, बांधकाम व्यावसायिक पी.आर.वाणी, संजय महाजन, धिरज महाजन, कैलास महाजन, ज्ञानेश्वर महाजन, लखन महाजन, सागर महाजन, विशाल देवरे, सलिम पटवे, पंकज मराठे, भावडु चौधरी, विशाल महाजन, खुशाल महाजन समाजबांधव यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content