Home Cities जामनेर पहूर येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याने वेधले ग्रामस्थांचे...

पहूर येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

0
101


पहूर-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून भव्य पालखी सोहळा काढण्यात आल्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधल्याचे पहायला मिळाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर येथे साईनगर भागात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भव्य दिव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले व सेवेकरांच्या उपस्थितीत प्रकट दिनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सुशोभित व सुसज्ज अशा ट्रॅक्टर सजवून त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य दिव्य प्रतिमेची गावातून पालखी सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी या पालखी सोहळ्यात पहूर परिसरातील असंख्य सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी सोहळ्याची सांगता श्री स्वामी समर्थ केंद्र पहुर येथे होऊन सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भावीकभक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पहूर येथील असंख्य सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound