भुसावळ, प्रतिनिधी । यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई जिल्हा केंद्र जळगाव यांच्यातर्फे शिक्षण कट्टा कार्यक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक धोरण धोरणावर आधारित वेबिनार परिसंवाद सोमवार, दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील असतील. वेबिनार परिसंवादात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण व अध्ययन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मनीषा जगताप, जळगाव व बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, भुसावळ हे सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे प्रास्ताविक श्यामकांत रूले मुक्ताईनगर हे करतील. हे वेबिनार झूम ॲपच्या 8149498020 या मीटिंग आयडीद्वारे तसेच फेसबुक लाईव्ह ऐकता येणार आहे. परिसंवादासाठी सचिव डॉ. सुनील पाटील, खजिनदार ज्ञानेश मोरे, निशा जैन, डॉ. अपर्णा कासार, अंजली पाटील, शंभू पाटील, श्री. सोनवणे प्रा. एन.डी. पाटील परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी श्यामकांत रूले मुक्ताईनगर 9822842952 यांच्याशी संपर्क साधावा.