धाबे जि.प. शाळेत बालक सुरक्षितता सप्ताहाचा समारोप

dhabe zp school

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील धाबे येथे जि.प. शाळेत येथील पोलीस स्टेशनकडुन बालकांना हक्क व सुरक्षितता सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आज (दि.२०) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील शेळावे व धाबे येथील जि.प. शाळेत बालकांना हक्क व सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान सप्ताह पाळण्यात आला होता, त्याचा समारोप आज करण्यात आला.

 

येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे व पोलीस काका पंकज राठोड यांच्या उपस्थितीत बालकांना मार्गदर्शन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ‘बालकांचे हक्क’ याविषयावर झालेल्या अधिवेशनास २० नोव्हेंबररोजी ३० वर्षे पुर्ण होत आहेत, याचे औचित्य साधुन संपुर्ण राज्यात ‘बालकांची सुरक्षितता’ या संदर्भात जनजागृत सप्ताह राबविण्याचे नियोजित करण्यात आलेले होते. सदर सप्ताह महाराष्ट्र पोलिस, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन व युनिसेफ यात सहभागी होते.

बालकांचे हक्क, बालकावर होणारे अत्याचार या विषयी माहिती देवुन त्यांना प्रतिबंध करणे, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचाराबाबत माहिती देवुन प्रतिबंध करणे, बालकांवरील अत्याचार लपवुन न ठेवता पोलिसांना अवगत करणे जेणे करून तत्काळ कार्यवाही करता येईल, अत्याचाराची माहिती चाईल्ड हेल्पलाईन – १०९८, पोलीस हेल्पलाईन – १०३ किंवा स्थानिक पोलीस ठाणे येथे देणे. असे उद्दिष्ट्य या जनजागृती मोहिमेचे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पो.नि. कानडे त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते ५० पेक्षा जास्त विदयार्थांना लेखन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री. कानडे यांनी यावेळी बालकांना मार्गदर्शन केले.  या अगोदर सप्ताह सुरु झाल्यावर शिक्षण विभागाकडुन पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे, बहादरपूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार, धाबे गावातील सुटीवर आलेले सैनिक विनोद भील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Protected Content