हिंमत असेल, तर आता ओवेसींवर राजद्रोह लावा – राम कदम

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद दौऱ्यात औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतले, यावरून देशाच्या मातीबरोबर गद्दारी करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी माथा  टेकवण्यासाठी जात असेल तर तो गद्दार आणि राजद्रोह नाही का?  हिंमत असेल, तर  आता ओवैसींवर राजद्रोह लावा, असे खुले आव्हान भाजपचे राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा, स्थानिक निवडणुका, मनसेची आक्रमक भूमिकावरून  महाराष्ट्राचे  राजकारण तापलेले आहे. राज्यात क्षुल्लक कारणावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक केली जात आहे. त्यातच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्या औरंगाबाद जवळील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतले.  यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाकडून महाराष्ट्र सरकारला लक्ष करीत राम कदम यांनी एक व्हिडीओ संदेशातून भूमिका स्पष्ट केली.

ज्या औरंगजेबाने आयुष्यभर छत्रपती शिवरायांना छळले, संभाजीराजांना क्रूरपणे मारण्यात आले. जुलमी प्रकार करीत देशाच्या मातीशी गद्दारी केली,त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी जाणारा गद्दार आणि आता राजद्रोह नाही का? महाराष्ट्र सरकारला लोकांवर राजद्रोहाचा गुन्हा लावण्याची भारी हौस आहे. तर आता  ओवैसींवर राजद्रोहाचा गुन्हा लावा. तुमच्यात किती हिंमत आणि साहस आहे हे महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांना पाहू द्या, ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकण्यासाठी जाण्याचे काय कारण? असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित  करीत राज्य सरकारला खुले आव्हान दिले आहे.

Protected Content