गेहलोत सरकारविरोधात भाजपा उद्या अविश्वास प्रस्ताव आणणार !

जयपूर (वृत्तसंस्था) शुक्रवारी राजस्थान सरकारविरोधात भाजपा अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, अशी घोषणा भाजपाने केली आहे. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होते आहे.

 

विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली आहे. अशोक गेहलोत सरकार लवकरच पडणार आहे असेही भाजपाने म्हटले आहे. काँग्रेस पक्ष आपल्या घरातले भांडण मिटवू पाहते मात्र ते मिटवणे त्यांना शक्य नाही. आपल्याच अंतर्विरोधामुळे हे सरकार पडणार आहे. मात्र काहीही कारण नसताना काँग्रेस आपल्या अपयशाचे खापर काँग्रेस भाजपावर फोडते आहे, असेही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे. या अधिवेशनातच हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचे बंड शमलेले आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणून भाजप आकडे कसे जुळवून आणते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content