यंदा मोदींची दिवाळी जैसलमेर सीमेवर

 

जैसलमेर ( राजस्थान ) : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी ते राजस्थानमधील जैसलमेरच्या सीमेवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत सीडीएस बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना उपस्थित आहेत.

राजस्थानमधील जैसलमेर येथून भारत-पाकिस्तानची सीमारेषा जाते. या ठिकाणी सीमेवर बीएसएफचे जवान तैनात आहेत. प्रसिद्ध तनोट माता मंदिरही याच ठिकाणी आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी येथील लोंगेवाला भागात बीएसएफच्या जवानांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटप करणार आहेत.

गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. सैन्याच्या गणवेशात जवानांमध्ये जाऊन त्यांना मिठाईचे वाटप केले होते. तत्पूर्वी २०१८ मध्ये त्यांनी उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

दरम्यान, पंतप्रधानांनी देशवासियांनी ट्वीटद्वारे आवाहन केलं आहे की, या दिवाळीला एक दिवा सॅल्युट टू सौल्जरसाठी लावा. जवानांच्या अद्वितीय साहसासाठी आपल्या हृदयात जी आभाराची भावना आहे ती शब्दांत व्यक्त केली जाऊ शकत नाही. आम्ही सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबियांचे देखील आभारी आहोत.”

Protected Content