२०० शेतकऱ्यांना अटक होते ; दीप सिद्धूला का नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केला जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली आहे”.अशी टीका आज संजय राऊत यांनी राज्यसभेत केली

संजय राऊत म्हणाले की, “ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे.

देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलेलं असून संसदेत राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये वादळी चर्चा सुरु आहे. शेतकरी आंदोलन हाताळण्यावरुन विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल विरोधक करत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बुधवारपासून चर्चा सुरु करण्यात आलेली असून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा करत आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला आहे. ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते देशासाठी योग्य नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचं सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा आणि प्रक्षोभक भाषण करणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण अद्याप फरार आहेत.
दीप सिद्धू पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याने कायद्याची पदवी घेतली आहे. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार काउन्सिलचा सदस्यही राहिला आहे. २०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं.

 

Protected Content