शिवसेनेच्या सर्व खासदारांना आमचा व्हीप लागू : शिंदे

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपला गट म्हणजेच शिवसेना असून पक्षाच्या सर्व खासदारांना याचे पालन करणे बंधनकारक असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि १२ बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना गटनेता बदलण्याच्या  मागणीचं पत्र दिलं.  त्यानंतर शिंदे आणि  १२  खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.. शिंदे म्हणाले, लोकसभा अध्यक्षांकडे लोकसभेचा गट तयार करण्याचं १२ जणांचं पत्र दिलं. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. याबाबत बैठक आणि चर्चा पार पडली. हे दोन विषय महत्वाचे असल्यानं मी दिल्लीत आलो होतो. प्रथम मी शिवसेनेच्या १२ खासदारांचं स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन केलं आहे.

 

याप्रसंगी शिंदे म्हणाले की, सन २०१९च्या सार्वत्रिक निवडणूकीत आम्ही एकत्रित लढलो होतो. त्यामुळं अडीच वर्षांपूर्वी जे शिवसेना-भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात येणं अपेक्षित होतं ते आता आम्ही स्थापन केलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक निर्णय घेतले. शेतकर्‍यांचं कर्ज, पेट्रोल-डिझेलवरील कर्ज कमी करण्याबरोबत शेतजमिनी ओलिताखाली आणण्याचे निर्णय घेतले. आमच्या या निर्णयांना केंद्र सरकारने पूर्ण पाठिंबा दिला, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, युती व्हावी ही उध्दव ठाकरे यांचीच इच्छा असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला.

Protected Content