यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मोकाट जनावरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा अन्यथा गोरे-गोरे नगर पालिकेच्या आवारात सोडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपरिषदेचे आरोग्य विभाग निरीक्षक अधिकारी दिलीप गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील मध्यवर्ती काही भागात पाणीपुरवठा हा योग्य वेळी केला जात असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्याच प्रमाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग असलेल्या गुरु चौक या भागात भर रस्त्यावर गोरी कुत्रे यांच्या अंगावर ठिकाणी जखमा झाल्या आहेत त्यातून रक्तस्राव होऊन तो सदृश्य पाणी वाहत आहे त्यामुळे नागरिकांना देखील आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे यावर नगर परिषदेने याची तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात व रोगराई होण्यास आळा घालावा नगरपरिषदेने निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोरे-गोरे नगर पालिकेच्या आवारात सोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर यावल शहराध्यक्ष आकाश चोपडे, मनसेचे तालुकाध्यक्ष जुगल पाटील तालुका उपाध्यक्ष गणेश येवले मनसेचे शहराध्यक्ष आकाश चोपडे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष विपुल येवले तुषार गजरे कुणाल गजरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.