सर्व पक्षीय उत्सव समिती म.फुले-डाॕ.आंबेडकर जयंतीची रक्कम देणार मुख्यमंत्री निधीला

धर णगाव, प्रतिनिधी ।येथे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वपक्षीय उत्सव समितीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जयंतीसाठी होणारा सर्व खर्च राज्य सरकारच्या मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचा निर्धार केला आहे. तसेच १४ एप्रिल रोजी घराघरात बाबासाहेबांना वंदन करुन आकाश कंदील , मेणबत्या ,पणत्या लावून ही जयंती साजरी करण्याचे आवाहन निमंत्रक तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसूर्य महात्मा फुले व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वपक्षीय उत्सव समितीने यासंसार्वजनिक स्वरूपात साजरी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे . या संदर्भात उत्सव समितीचे अध्यक्ष डी.जी पाटील ,उपाध्यक्ष गुलाबराव वाघ ,कार्याध्यक्ष शिरीष बयस ,सचिव डाॕ.संजीवकुमार सोनवणे , सहसचिव शरदकुमार बन्सी यांच्याशी निमंत्रक दिपक वाघमारे यांनी चर्चा करुन र्कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगितले. तरी या सर्वपक्षीय उत्सव समितीच्या सदस्यानी व गावातील मान्यवरांनी,प्रतिष्ठीत नागरीकांनी तसेच भिमसैनिकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपली रक्कम जमा करुन १४ एप्रिल रोजी डाॕ. आंबेडकरांची जयंती घरोघरी बाबासाहेबांना वंदन करुन तसेच आकाश कदील वा मेणबत्या, पणत्या लावून साजरी करावी.कुणीही गल्लीत वा गावात सामूहिक पूजन वा मिरवणूक काढू नये असे आवाहन निमत्रंक दिपक वाघमारे यांनी केले आहे.

Protected Content