मेहरूण येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर करवाई; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवार 11 डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० कारवाई केली. वाळूने भरलेले ट्रक्टर जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मोहाडी येथील गिरणा नदीच्या पत्रातून बेकायदेशीर ट्रॅक्टरने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. शिकारे यांनी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.कॉ. योगेश बारी, पोहेकॉ जितेंद्र राजपूर होमगार्ड किरण जोशी, शिवदास कळसकर अशांना ट्रक्टरवर कारवाईसाठी रवाना केले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरातील मेहरूण परिसरातील बागेजवळ वाळूने भरलेले ट्रक्टर आढळून आले. ट्रॅक्टर चालकाला वाळू वाहतूक करण्याची परवाना मागितले असता उडवाउडवीची उत्तरे चालक संदीप मधुकर कोळी (वय-२०) रा. नागझिरी ता.जि.जळगाव याने दिली. वाळू वाहतूकीचा पंचनामा करून ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. असून पोहेकॉ जितेंद्र राजपूत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे

Protected Content