आरटीपीसीआर तपासणी शिबिरास प्रारंभ

 

भुसावळ : प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर द्वारे भुसावळ शहरात व्यापक स्वरूपात आरटीपीसीआर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज भुसावळ शहर पोलिस स्टेशन पासुन झाला

.भुसावळ पोलीस स्टेशन मधील मधील सर्व होमगार्ड, कर्मचाऱ्यांची आणि अधिकारी वर्गांची आज तपासणी झाली असून कोरोना बद्दल जनजागृती देखील करण्यात आली.या सर्वांचे तपासणी अहवाल सोमवारी येणार आहेत,त्यानुसार पुढील उपचाराची अथवा विलगीकरण सुरू होईल.

कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्‍यता पाहता जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार भुसावळ शहरात ज्यांचे जास्तीत जास्त जास्त लोकांची संपर्क येतो अशाची तपासणी करण्याचे नियोजन असून पोलीस बंधू पासूनच सुरुवात झाल्यामुळे पुढील तपासणी शिबिरात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल असा आशावाद पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी व्यक्त केला.

सोमवारी बाजार पोलीस स्टेशन मधील पोलीस बंधूंचे तपासणी शिबिर होणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि तु पाटील, ग्रामीण रुग्णालय भुसावळ व ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, संजय पाटील, सय्यद इकबाल, संजय टाकणे, विजय पाटील, मोहन पाटील, सचिन चौधरी, अनिल चौधरी, मोहम्मद अली, विनोद गोसावी, आशा तडवी, विनोद तडवी, समाधान पाटील आदी उपस्थित उपस्थित होते, यावेळी सागर सोनवणे, विद्या तायडे, एलियास शेख, निरंजना साळवे या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

डॉ मयूर चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेले हे हे व्यापक तपासणी शिबिर नक्कीच संक्रमणाचा दर कमी करण्यासाठी मदत करेल आणि हा भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणार यात शंका नाही.

Protected Content