शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील पोलिसांनी जवळच असलेल्या मेणगाव येथे गावठी दारू विक्री करणार्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शेंदूर्णी येथील पोलीसांनी मेणगाव येथे संध्याकाळी छापा टकला. यात मराठी शाळेजवळ पाण्याचा टाकीच्या आडोश्याला प्रल्हाद विश्वनाथ कोळी (वय ३१) व ज्ञानेश्वर मधुकर पाटील हे दोन्ही प्लास्टिक पाऊच मध्ये गावठी दारू विकत असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्यादी गजानन सुभाष ढाकणे नेमणूक पहुर पोलिस स्टेशन यांचे फिर्यादी वरून गुरनं ९८/९९/२०२० नुसार मुंबई ६१ ब क ६५(इ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.