Home क्राईम जुन्या वादातून तरूणाला बेदम मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून तरूणाला बेदम मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील अभिनव शाळेसमोर जुन्या वादाच्या कारणावरून एका १६ वर्षीय मुलावर लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईशान योगेश महाले (वय १६, रा. श्रीराम नगर, टाकळी प्र.चा.) याने सहा महिन्यांपूर्वी संशयित आरोपी आरोपी तन्मय मोरे, रोहीत चौधरी आणि ज्ञानदीप चौधरी (सर्व रा. टाकळी प्र.चा.) यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या रागातून तिघांनी सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेच्या सुमारास इशान याला गावातील अभिनव शाळेसमोरील सार्वजनिक ठिकाण आडवून शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी ईशान महाले याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound