Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी -जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागातून बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, ही मुलगी गुजरात राज्यातील मढी रेल्वे स्टेशनवर मिळून आली असून, या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सोमवारी ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या रामानंद नगर बस स्टॉप जवळील परिसरात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही २७ मार्च रोजी रात्री ९ वाजेपासून बेपत्ता झाला होती. मुलगी बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ माजली होती. तातडीने तपास चक्रे फिरवण्यात आली असता, ही मुलगी गुजरात मधील मढी रेल्वे स्टेशन येथे मिळून आली. मुलीचा शोध लागल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी तिला कोणी आणि का पळवून नेले अशी तक्रार तिच्या पालकांनी केली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound