…तर संकुलातील दुकाने सुरू करण्यासाठी न्यायालयात जाणार-खा. उन्मेष पाटील

जळगाव प्रतिनिधी । व्यापारी संकुलांमधील दुकाने उघडण्याचा निर्णय न झाल्यास यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा खासदार उन्मेष पाटील यांनी दिला आहे.

जळगाव शहरातील विविध व्यापारी संकुलांमधील दुकाने सुरू करण्याबाबतची मागणी करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत बैठक घेण्यात आली. यानंतर खा. उन्मेेष पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, स्थायी समिती सभापती शुचिता हाडा तसेच व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर खासदार पाटील पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, राज्य सरकारने कंटेन्मेंट झोनमधील कॉम्प्लेक्स व मॉल बंदीबाबत सुधारित आदेश काढले आहेत. परिणामी जळगाव शहरातील कॉम्प्लेक्समधील दुकाने बंद असल्याने सुमारे ५० हजार नागरिकांचा रोजगार ठप्प आहे. त्या अनुषंगाने आपण राज्याचे मुख्य सचिव व राज्य आपत्ती विभागाचे सचिव किशोर राजे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ३० जून रोजी याबाबत राज्य सरकार सुधारित आदेश काढण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

Protected Content