मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पेन्शनर भवन येथे मुक्ताई ज्येष्ठ नागरिक संघ, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, ज्येष्ठ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
मुक्ताई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर .टी .जोगी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर वाढदिवस असलेले सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्येष्ठ सल्लागार वसंतराव चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिश्चंद्र कोळी, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्र. ग. माळी, ना. वि. चौधरी, बारसू खडसे आदी उपस्थित होते.
येथील ज्येष्ठ सल्लागार वसंतराव चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिश्चंद्र कोळी यांचे वाढदिवसांचे औचित्य साधून मुक्ताई ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने रुमाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुक्ताई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. जोगी , सेवानिवृत्त उपनिबंधक बी. डी. गवई , आनंदा कोळी, ना. वि. चौधरी, शामराव चौधरी, डॉ. आर एम पाचपांडे, रामरोटी आश्रमचे अध्यक्ष किशोर गावंडे, आश्रमाचे सचिव रामभाऊ टोंगे, दत्तात्रय श्रीखंडे, वसंत बोंडे , लक्ष्मण पिंप्रीकर , किशोर पाटील, शकुर खाटीक , तुकाराम पाटील, दि. बा. पाटील, रघुनाथ काकडे , मधुकरराव महल्ले, मधुकर धायडे, खुशतर हुसेन कुरेशी , पद्मावती महल्ले, राजकन्या जोगी, विजया बोंडे, सुशीला निळे, आशालता बिरहाडे यासह जेष्ठ नागरिक पुरुष महिला उपस्थित होते.
सत्कारमूर्ती ज्येष्ठ सल्लागार वसंतराव चौधरी ,ह.रा. कोळी यांचे विषयी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रमेश जोगी , सुत्रसंचालन मंडळाचे सचिव तुकाराम पाटील यांनी तर आभार मंडळाचे चिटणीस रघुनाथ काकडे यांनी मानले.