मुंबई (वृत्तसंस्था) राबोडी येथे नातेवाईकाकडून पाहुणचार करून बोरिवली (पडघा) इथे पतीसह दुचाकीवरून घरी परतत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडकेत दोन लहान मुलांसह विवाहितेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पती गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात दुचाकीवरील महिला आणि तिची दोन मुलं जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावरील वालशिंद गावच्या हद्दीत घडली आहे. अरबीना सलीम खान (26 ), वसीम खान (5 वर्ष 6 महिने) , रिहान खान (3 वर्ष ) अशी अपघातात ठार झालेल्या माय लेकांची नावं आहेत. तर चालक पती सलीम खान (34) हा गंभीर जखमी झाला आहे.