Home क्राईम कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या गोवंशांची पोलिसांनी केली सुटका

कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या गोवंशांची पोलिसांनी केली सुटका

0
145


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कत्तलीसाठी वाहतूक होत असलेल्या १० गोवंशांची सुटका करत रावेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बोलेरो पिकअप वाहनातून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात ही गोवंशाची वाहतूक सुरू होती. पोलिसांनी अहिरवाडी येथे मध्यरात्री ही कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक तुषार पाटील व त्यांच्या पथकाने रात्री कारवाई केली. मध्यरात्री सुमारे २.३० वाजता मध्य प्रदेशातून येणारी बोलेरो पिकअप वाहन पोलिसांना संशयास्पद आढळली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ९३ हजार रुपये किमतीच्या ६ गाई व ४ वासरे असे एकूण १० गोवंश आढळून आले.

या गोवंशाची निर्दयतेने वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी सर्व गोवंश खानापूर येथील गोशाळेत हलवले असून बोलेरो पिकअप वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी रायसिंग उर्फ भाया रामसिंग अजनाडे आणि आकाश शांताराम आवले उर्फ बारेला (दोघेही रा. लालमाटी) यांच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील, पो.का. प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण करित आहेत.


Protected Content

Play sound