‘व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा’ – सागर फुंडकर

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ‘व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेतून भाजप देशात प्रामाणिकपणे काम करत आहे, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया समन्वयक सागर फुंडकर यांनी केले. भाजप स्थापना दिनानिमित्त आज येथील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वप्रथम सागर फुंडकर यांनी आपल्या घरावर भाजप ध्वज फडकविला. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकऱ्यांसह भाजप कार्यालयावर ध्वजारोहण केले. या प्रसंगी पुढे बोलताना सागर फुंडकर म्हणाले की, सेवा आणि समर्पणातून एखादा पक्ष कसा मोठा होतो याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भारतीय जनता पक्ष. अनेक पिढ्यांनी या पक्ष वाढीसाठी काम केले, तर अनेकांनी यासाठी बलिदान दिले. त्यांच्यामुळेच जनसंघाचा झालेला भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आज देशात 18 राज्यात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या  सर्वनिवडणुकीतही भाजप आपला झेंडा फडकवेल असा निश्चय करून जोमाने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यानंतर त्यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या थेट संबोधनाचा कार्यकर्त्यांसोबत लाभ घेतला.

यावेळी यांचेसह भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, डॉ एकनाथ पाटील, ओमसेठ खंडेलवाल, सत्यनारायण थानवी, महादेवराव कांबळे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, नगेंद्र रोहनकार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, नगरसेवक राजेंद्र धनोकर, गणेश सोनोने, विलास काळे, सौ शिवानीताई कुळकर्णी, संजय शर्मा,  शेखर कुळकर्णी, जितेंद्र पुरोहित, अनिसभाई जमादार, अशोक हत्तेल, अरुण अकोटकर, शंभू शर्मा, वैभव डवरे, रमेश इंगळे, युवराज मोरे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राज पाटील, प्रसाद एडलाबादकर, आशिष सुरेखा, संदीप राजपूत, यश आमले, पवन डिक्कर, सोनू निभेवाणी, अँड वाधवानी, विनय शर्मा, श्री देशमुख, सुपेश साखरे, रुपेशशर्मा, विक्की रेठेकर, विक्की हत्तेल, भावेंद्र दुबे, चंदू भाटिया, शशी वक्ते, प्रीतम चव्हाण, उमेश बंड, सुनील वानखडे, योगेश आळशी,  लोखंडे, राम शिंदे, किशोर लोखंडे, सुनील वानखडे, अमोल राठोड आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम‌् तर शेवट राष्ट्रगीताने झाला. तसेच 6 ते 10 एप्रिल पर्यंत ” अभिमान – अभियान” या सप्ताहाचा प्रारंभ केला.

 

Protected Content