मुंबईत दोन पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत दोन पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाने आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील आठ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात हा आकडा आता ११ वर पोहोचला आहे.

 

शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदार यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. मोटार परिवहन विभागात सहायक फौजदार असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक हे ५७ वर्षांचे होते. दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांमध्ये १००हून अधिक पोलीस अधिकारी आणि ९०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Protected Content