कोरोना इफेक्ट: लाखो रुपयांचे मासे बोटींमध्येच पडून; मच्छिमार चिंतेत

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात गेल्या दोन दिवसांपासून संचारबंदी लागू करण्याआधी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या अनेक बोटी आता किनाऱ्यावर परतल्या असून या बोटींमध्ये असलेले मासे करायचे काय, असा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे.

मासेमारी करून परतलेल्या असंख्य बोटी गेल्या चार दिवसांपासून तशाच उभ्या आहेत. या बोटींमध्ये लाखो रुपयांचे मासे पडून आहेत. याकडे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात संचारबंदी लागू होण्याआधीच अनेक बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या होत्या. सात ते आठ दिवसांनंतर या बोटी आता किनाऱ्यावर परतल्या आहेत. पालघरमधील सातपाटी, वसई या बंदरांसह सर्वच बंदरांत सध्या शेकडो बोटी उभ्या आहेत. या बोटींमध्ये लाखो रुपयांचे मासे पडून आहेत. या माशांची विक्री करण्यासाठी सरकारने आम्हाला परवानगी द्यायला हवी, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे.

Protected Content