पाचोरा, प्रतिनिधी । अखिल भारतीय मिना समाज महासभा या संघटनेची महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून त्यात निशा महेर यांची अखिल भारतीय मीना समाज महासभा संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मिना समाज महासभा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी निशा महेर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद, प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ, सुभाष डोभाल, दिपक डोभाळ, गोपाल चन्नावत, दिनेश शिहरा, कैलास टाटू, दिनेश शिहरा यांच्या उपस्थितीत सपना धनावत, शोभा जोनवाल, संगीता कायटे, योगिता चेडवाळ, जयश्री शिहरा, निशा महेर, छाया जोनवाळ, वर्षा कायटे यांनी अभिनंदन करुन निशा महेर यांचा सत्कार करण्यात आला. निशा महेर यांच्या निवडीबद्दल सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.