ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलनासाठी १६ रोजी पाचोर्‍यात मेळावा

पाचोरा प्रतिनिधी | ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलनाच्या नियोजनासाठी दिनांक १६ ऑगस्ट रोजी पाचोरा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात ओ.बी.सी.चे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. याचा प्रथम टप्पा जळगाव जिल्हा महाबैठक- मेळावा मधून सुरुवात होत आहे. यासाठी १६ ऑगस्ट रोजी स्व. राजीव गांधी टाऊन हॉल, दुसरा मजला, मानसिंगका कॉर्नर, शिवाजी चौक, पाचोरा येथे दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

आयोजित करण्यात आला आहे. ओ.बी.सी. नेते अनिल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभरातील सर्व ओ.बी.सी. – बहुजन समाजातील समाज बांधव ह्या महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले ओ.बी.सी. समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा आबाधित करा या मागणीसाठी सर्वपक्षीय ओ.बी.सी. समाजातील प्रमुख लोक पाचोरा येथे मेळावा मध्ये एकत्र येऊन विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवणार आहेत. ही बैठक- मेळावा हा सर्व बहुजनांसाठी आहे. कोणीही निमंत्रणाची वाट पाहू नये आपल्या हक्कासाठी आपल्या अस्तित्वासाठी जिल्हाभरातून सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र यावे हीच ती वेळ आपले संघटन कौशल्य दाखविण्याची आहे. आता नाही तर कधीच नाही आपल्या पुढील पिढीला भविष्य उरणार नाही. जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ओ.बी.सी. राजकीय आरक्षण बचाव महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते अनिल महाजन यांनी केले आहे.

अठरापगड जाती, बाराबलुतेदार, आलुतेदार समाजावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, शिष्यवृत्तीचा विषय असेल प्रत्येक ठिकाणी यांना संघर्ष करावा लागतो. ओ.बी.सी. समाजातील माळी, धनगर, वंजारी, तेली, तांबोळी, धोबी, परीट, सोनार, कुणबी ओ.बी.सी. मधील सर्व मुख्य घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत यासाठी आपल्याला या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आपली ओ. बी. सी. बांधवांची एकी दाखवायची असल्याचे प्रतिपादन अनिल महाजन यांनी केले आहे.

Protected Content