दहावीचा परिक्षेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पाचोरा येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने दहावीत १०० टक्के यशाची परंपरा सलग दहाव्या वर्षी कायम ठेवली आहे.

यात प्रामुख्याने प्रथम क्रमांकाने कु. प्रियदर्शनी प्रशांत सिनकर (९६.६० टक्के), द्वितीय क्रमांकाने कु. आरुषी जयदीप जाधव (९६.०० टक्के) व तृतीय क्रमांकाने कु. धनश्री उमाकांत मोरे (९५.४० टक्के) व  चि. स्वरूपसिंग महेंद्रसिंग पाटील (९५.४० टक्के) आणि चतुर्थ क्रमांकाने कु. कल्याणी प्रवीण पाटील (९५.२० टक्के) हे विदयार्थी उत्तीर्ण झाले असून  गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, पुष्पलता पाटील सी. ई .ओ. अतुल चित्ते पर्यवेक्षिका विद्या थेपडे व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!