नेरी विकासो नवनिर्वाचित संचालकांचा भाजपात प्रवेश

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नेरी विकास सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचे औचित्य साधून सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार व भाजपा प्रवेश कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेरीचे सरपंच सचिन पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित चेअरमन अशोक पाटील व व्हा. चेअरमन सोमा अहिरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक आदिल पठाण यांच्यासह बशीर पठाण, सोमा अहिरे व अनेक तरुणांनी भाजपा अधिकृत प्रवेश केला.

याप्रसंगी गावातील शेतकरी, नागरिक व मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता. मागील काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पासून नेरी येथे भाजपाचे मताधिक्य वाढतच आहे. विधानसभेच्या वेळेस अमोल शिंदे यांना देखील नेरी मधून विक्रमी मताधिक्य मिळाले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता स्थापन केली. आणि आता विकास सोसायटी वरही भाजपचेच निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. नेरी गावाने अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला जे झुकतं माप दिले. त्याबद्दल नेरी ग्रामस्थयांचे आभार मानले.

याप्रसंगी नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रशेखर पाटील, देवीदास पाटील, समाधान पाटील, समाधान बोरसे, कल्पेश सोनगिरे, रतन अहिरे इत्यादी मेहनत घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेहते यांनी काम बघितले तसेच  वानखेडे यांनी सहकार्य केले

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!