यावल-चोपडा वनक्षेत्रात धुळे विभागाचे वनसंरक्षकांचा दौरा संपन्न

यावल-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे विभागाचे वनसंरक्षक डिगंबर पगार यांचा यावल व चोपडा वनविभागात दोन दिवसांचा दौरा झाला. या दौऱ्यात सातपुडा क्षेत्रातील विविध ठिकाणी वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. यावेळी वनअधिकारी व वनकर्मचारी यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, वनविभागाच्या प्रादेशीक वनवृतचे वनसंरक्षक डिगंबर पगार यांचा यावल-चोपडा या वनक्षेत्राचा दोन दिवसी पाहणी दौरा संपन्न झाला. यावेळी वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी या ठीकाणांची पाहणी केली. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग, प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा/ यावल, यांचे प्रयत्नाने वनाचे संरक्षण कामात उपयोगी असलेले साहित्यात दुर्बीण, कापडी तंबू, जीपीएस यंत्र, बॅटरी, वनउपज तपासणी नाक्यावर आणि मिळालेली बातमीनुसार रस्तावर वाहनांची तपासणी करिता वाहने थांबविण्यासाठी आवश्यक असलेले बॅरिगेट तसेच अवैध अतिक्रमण काढण्याचे, अवैध वृक्षतोड नियंत्रण करण्याचे कार्यवाही दरम्यान जमावापासून वनअधिकारी, वनकर्मचारी यांना स्वसंरक्षणासाठी शील्ड, हेल्मेट आणि चेस्ट गार्ड प्रोटेटोर आदी असलेले आवश्यक साहित्य, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, यावल पश्चिम, रावेर,गस्ती पथक यावल आणि वनपाल यांना साहित्य वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव यांनी वनअधिकारी , वनकर्मचारी यांनी वनसंरक्षणाच्या कामात हलगर्जीपणा करु नये तसेच वनक्षेत्रात अवैधरित्या असलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी व आपल्या सर्वांच्या मदतीने वन्यजीव संरक्षण जंगल संरक्षण कामकाज करावे असे मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमात विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनपाल रविंद्र तायडे,अतुल तायडे,रज्जाक तडवी,राजेंद्र खर्चे, विपुल पाटील, राजु पाटील,विजय बोराडे,रविंद्र सोनवणे, अरविंद धोबी,राजु जाधव यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल यांनी मानले.

Protected Content