प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, सीबीआय आणि ईडी या केंद्रीय यंत्रणा आहे. पण या दोन्ही यंत्रणांचा वापर केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी करीत आहे. इतकेच नव्हे तर ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्याही ठिकाणी भाजप या दोन्ही यंत्रणांचा वापर करून अस्थिरतेचे वातावरण निर्माण करू पाहत आहे. राजकीय पुढाऱ्यांना तपास यंत्रणांच्या जाळ्यात गुंतवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा डाव भाजपचा आहे. राज्यातील सत्ता गमावल्यामुळे भाजपाच्या नेत्यांचा जीव कासावीस झाला आहे. असा देखील आरोप त्यांनी केला आहे.
पुढे बोलतांना कवाडे म्हणाले की, पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा महाविकास आघाडीचा एक घटक आहे. पण अद्यापही मित्र पक्षांची समन्वय समिती अद्यापही गठित करण्यात आलेली नाही. ही समिती वेळी गठित करून महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकहितार्थ असलेला किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच पीआरपीला सत्तेत वाट मिळावा अशी इच्छा त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी पक्षाचे जेष्ठ नेते सुरेश सोनवणे, राज्य प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, उत्तर महाराष्ट्राचे नेते राजू मोरे, जळगाव महानगराध्यक्ष कल्पेश मोरे, शहराध्यक्ष नारायण सपकाळे, शशि उन्हवळे, मुकुंद सपकाळे, जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, मिलींद सोनवणे, शशिकांत सोनवणे, विलास निकाळे, इरुान शेख, किरण पवार यांच्यासह आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/363853105730076