अतिक्रमण केलेली घरे जेसीबीच्या मदतीने तोडली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील पांझरापोळ परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने अतिक्रमण करून बांधलेले घरे जेसीबीच्या मदतीने गुरूवारी ४ मे रोजी सकाळी ११ वाजता तोडण्यात आले. यावेळी शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील पांझरापोळ जवळ असलेल्या गट नंबर १६३/१ मधील सार्वजनिक रोडच्या जागेत काहींनी अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या घराचे बांधकाम केल्याचे समोर आले होते. यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने संबंधित घराचे मालक यांना नोटीस बजावून अतिक्रमण केलेले घर काढण्याच्या सुचना दिल्या होत्या. दरम्यान, महापालिकेने बजावलेल्या नोटीसाबाबत कोणतीही दखल न घेतल्याने अखेर गुरूवारी ४ मे रोजी सकाळी ११ वाजता जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या मदतीने रोडवर बेकायदेशीर बांधकाम केलेले घरे तोडण्यात आली. हे अतिक्रमण शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. यावेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

Protected Content