केसीईच्या आयएमआर महाविद्यालयात ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’वर सेमिनार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केसीईचे आयएमआर येथे इंटेलेक्चुअल प्राॅपर्टि राईटवर नुकताच सेमिनार आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची प्रस्तावना एकेडेमीक डिन डॉ. तनुजा महाजन यांनी केली. प्रमुख पाहुण्याची ओळख डॉ वर्षा पाठक यांनी करुन दिली.

प्रमुख पाहुणे केसीएआय डीसीचे कोआॅरडिनेटर निखील कुलकर्णी यांनी स्टार्ट अप म्हणजे काय? तुमच्या मनात व्यवसायासंबधी काय विचार आहेत आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावे लागते ते विद्यार्थींना समजवून सांगितले. त्यासाठी कसे आणि कोणते लायसन्स घ्यावे लागतात. पेटंट कसे घ्यायचे? प्रोटेक्ट कसे करायचे. युनिक सेलिंग पाॅईंट कसे ठरवायचे, याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

आपले असेट कसे ओळखायचे यावरही ते सविस्तर बोललेत. थाॅट प्रोसेस कशी हवी, आजच्या घडीला जागतिक स्तरावर अॅसेटच्या द्रृष्टीकोनातुन सर्वात मोठी कंपनी अॅमिरेनो आहे तर अ‍ॅपल ही प्राॅफीटचा विचार करता मोठी आहे.

अनेक गोष्टींचे पेटंट त्याच्याकडे आहे. ॲपल टिएसआय.. रेड प्राॅड्क्ट रेव्हेन्यू सी एस आर साठी देतात. रिव्होकींग कसे करतात, याविषयी त्यांनी माहिती दिली.

तुमच्या परवानगीशिवाय तुमचे प्राॅड्क्ट कोणी विकू शकत नाही. तुम्ही घरी बसुन राॅयल्टी एन्जॉय करु शकतात. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पाॅलीसी असते ती लक्षात घेऊन तुमचे प्राॅड्क्ट तुम्ही विकू शकतात. रुदयेश सिंग भारती या जयपुरच्या मुलाने सहा लोक बसुन खेळू शकतील असा बुध्दीबळाचा गेम डेव्हलप केला. साध्या झाडुचेही इंटरनॅशनल पेटंट मिळू शकते. जे सॅम हुंगटन या युकेच्या नावावर आहे. त्याचे वय वर्षे 5 आहे. तसेच ट्रेड मार्क कसा जरुरी असतो ते त्यांनी समजून सांगितले. शिवाय काही प्राॅड्क्ट कसे वाढतात, ते उदाहरणे देऊन सांगितले. वेंडिंग मशीन आता काॅमन आहे, फाईल घ्यायच्या आहेत.. पैसे टाका.. फाईल बाहेर येतिल तसेच टि मशीन, काॅफी मशीन, पॅड मशीन अशी वाढती त्यानी सांगितली.

काही गोष्टी पेंटन्ट कश्या होतात त्यात त्यांनी भरीत वांगे आणि जळगावची केळी याविषयी ते बोलले.

तर रायगडचा आंबा, देवगडचा आंबा यावर कोर्टात केस झाली पेटंट साठी पण कोर्टाने निकाल दिला आंबा हे कोकणचे पेटंट आहे.

Aelita Andre ही सर्वात कमी वयाची मुलगी एबस्टॅक्ट पेंटिंग करते जे करोडोत विकले जातात.

स्टॅपलरच्या पिन कधी संपतात ते कळत नाही म्हणून शेवटच्या 6 पिनला वेगळा रंग लावला, एका छोट्या मुलीने हे पेटंट कॅमल कंपनीने तिच्या कडुन विकत घेतले. ट्रॅव्हल कंपनीच्या बॅगला चाके लावण्यात इनोव्हेशन शोधले एकाने.. त्याचे पेटंट सॅमसंगने विकत घेतले.

श्री निखिल कुलकर्णी यांनी पेटंट म्हणजे काय? पेटंट फायलिंगमध्ये आपल्याला सरकार ने 80 %सुट दिली आहे. पेटंट पब्लिकेशन्स नं तुम्हाला दिला जातो. पेटंट तयार झाल्यावर एफईआर (FER) first examination report तयार होतो.

ओजस पाटिल या विद्यार्थ्यांने आपले अनुभव सांगितले. या कारेक्रमाला डॉ शमा सराफ, डॉ अनुपमा चौधरी, एम बी ए कोआॅरडिनेटर डॉ पराग नारखेडे, यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content