मालेगाव महापालिकेच्या ३३ कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा

मालेगाव (वृत्तसंस्था) कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी पदभार स्वीकारताच ३३ कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या २७४ वर गेलीय. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी त्र्यंबक कासार यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली होती. मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता शासनाने किशोर बोर्डे यांच्या जागी कासार यांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. मालेगावमधील किल्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कलम १८८ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मालेगावात एकूण ४२ भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर आज दुपारी आलेल्या अहवालात नव्याने १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजच्या रुग्णात एसआरपीएफच्या चार जवानांचाही समावेश आहे. सुदैवाने १०६ जण निगेटीव्ह ठरले आहेत. तर आतापर्यंत ७ रुग्ण बरे होऊन परतले आहेत.

Protected Content