यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मारूळ गावातील रस्त्यांसह सांडपाण्याचा प्रश्न आमदार शिरीष चौधरी यांनी स्थानिक आमदार निधीतून रस्ता आणि गटारींच्या कामांना मंजूरी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. विकास कामे मार्गी लागल्यामुळे सरपंच असद सैय्यद यांनी आमदार चौधरी यांचे आभार मानले आहे.
मारूळ गावातील सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटार व काही प्रमुख मार्गावरील कॉक्रीटचे रस्ते यांची अत्यंत गरज होती. ती गरज लक्षात घेत आमदार शिरिष चौधरी यांच्याकडे सरपंच असद सैय्यद यांनी गावातील नागरीकांना भेडसावणारे हे ज्वलंत प्रश्न मांडला. दुसऱ्या क्षणी तो प्रस्ताव आ.शिरीष चौधरी यांनी मान्य करून आपल्या स्थानिक विकास निधीतून गावासाठी कॉक्रीट रस्ते व कॉक्रीट गटार मंजूर केलीत. सरपंच यांनी केलेला पाठपुरावा व त्यास सोडविण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी दिलेले बळ यामुळे गावाचे काही महत्वाचे प्रश्न मार्गी लागल्याने मारुळवाशी यांनी आमदार चौधरी यांचे आभार मानले आहेत. त्याच बरोबर या गावाच्या विकास कामांना चालना देण्यासाठी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य जावेद अहमद सैय्यद यांच्या अनमोल मार्गदर्शन लाभले. सरपंच असद सैय्यद, उपसरपंच सलामत अली सैय्यद व सर्व सन्मानिय ग्रामपंचायत सदस्य हे गावच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन काम करीत असल्याने ग्रामस्थ मंडळीत मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत आहेत.