अक्षयतृतीयेला गोमातेला चढणार ५६ भोग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येत्या अक्षय तृतीयेला शनिवारी 22 एप्रिल रोजी पळासदडे रोडवरील श्रीमती भानूबेन शहा गोशाळेत येथे गोमातेसाठी भव्य ५६ भोग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमळनेरच नव्हे तर संपुर्ण खान्देशात व उत्तर महाराष्ट्रात प्रथमच असा कार्यक्रम होत आहे. अमळनेर शहर व तालुक्यातील गोसेवकांच्या संकल्पनेतुन आणि दानदात्यांच्या योगदानातून हा कार्यक्रम होत आहे.

 

यादिवशी ३३ कोटी देवतांचा निवास असलेल्या गोमतेला ५६ भोग म्हणजे ५६ प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांचा (मिठाई, पुरणपोळी, द्रायफुट, फळे, भाजीपाला, गूळ, चारा, ढेप यासह अनेक प्रकारचे खाद्य) भोग गोशाळेत असलेल्या सुमारे ३३५ गोमातांना चढविला जाणार आहे. हा कार्यक्रम निश्चितच सर्वाना मनशांती आणि आनंद देणारा ठरणार असून अविस्मरणीय असा तो क्षण असणार आहे. विशेष म्हणजे जोडीने आलेल्या प्रत्येक दाम्पत्यास गोमतेस भोग लावण्याचा मान दिला जाणार आहे.

Protected Content