मानमोडी येथील माजी उपसरपंच उपसरपंचांनी स्वखर्चाने केली डेंग्यू नियंत्रण धूळफवारणी

बोदवड, प्रतिनिधी | तालुक्यातील मानमोडी गावाचे माजी उपसरपंच जगदिश कोळी यांनी समाजहित जोपासत  गावात डेंग्यूचा शिरकाव गावात होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण गावात डेंग्यू नियंत्रण धूळफवारणी स्वखर्चाने केली.

 

याबाबत अधिक वृत्त असे की, तालुक्यातील आदर्शगाव मानमोडी येथील माजी उपसरपंच जगदिश कोळी यांनी समाजहित साधत गावात डेंग्यूचा शिरकाव होवू नये व आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये यांसह डासांमुळे कोणत्याही प्रकारच्या रोगराई गावात शिरकाव करू नये यासाठी उपाययोजना म्हणून स्वखर्चाने डेंग्यू नियंत्रण धूळफवारणी केली. यावेळी त्यांना कैलास पाटील, प्रविण पाटील,पंकज पाटील,सागर वाघ,रघूनाथ दामू कोळी, सुनिल पाटील,धनंजय पाटील, श्रीकांत पाटील, बाळू पाटील, समाधान पाटील, योगेश कोळी, बाबुराव कोळी, चंदू वाघ, बापू पाटील, दगडू रामचंद्र पाटील, आदींचे सहकार्य लाभले.

Protected Content