अमळनेरात सरदार पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

अमळनेर प्रतिनिधी | पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सरदार पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमांना माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले.

 

स्पर्धा परीक्षा केंद्रातील व्याख्याते पाचोरा येथील देविदास सावळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले तर सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला माल्यार्पण केले. स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार यांनी भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला. सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे यांनी वाचनालयाचे जेष्ठ वाचक, साहित्यिक, पत्रकार गं .का सोनवणे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या आठवणी जिवंत करत यांना वाचनालयाच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी वाचनालयात सानेगुरुजी वाचनालयाचे उपाध्यक्षा डॉ. प्रा.माधुरी भांडारकर ,ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, पी.एन. भादलीकर, ईश्वर महाजन, दिपक वाल्हे, प्रसाद जोशी, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भंडारकर, सेवानिवृत्त शिक्षक पी. पी. माळी व सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content