जळगाव औरंगाबाद हायवे रस्त्यावर नियमांची पायमल्ली करत फटाके दुकाने सुरू

जामनेर प्रतिनिधी । जळगाव औरंगाबाद हायवे रस्त्याला लागून नेरी ते पाळधी दरम्यान अनेक फटाक्यांची दुकाने लावण्यात आले आहे. परंतू कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली जात असून याकडे प्रशासनाने लक्ष देवून संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव औरंगाबाद हायवे रस्त्यावर नेरी ते पाळधी दरम्यान सुमारे ८ ते १० फटाके विक्रीचे गोडाऊन व दुकाने दरवर्षी लावले जातात. त्याचप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणावर लागले असून दिवाळीजवळ आल्यामुळे या फटाके दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. फटाके घेण्यासाठी या दुकानात मोठी गर्दी होत आहे.  एकाही ग्राहक व मालकाच्या तोंडाला मार्क्स लावले जात नाही. त्यामुळे शासनाने कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या नियमाचे पालन केले जात नसून यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर फटाके विक्री करताना ग्राहकांची सुरक्षेची जबाबदारी संबंधित दुकानदारावर असते, मात्र हे दुकानदार कोणत्याही प्रकारे अशा उपाययोजना केलेल्या नाही. त्याचबरोबर जळगाव-औरंगाबाद हायवेला लागूनच ही फटाक्यांची दुकाने लावण्यात आली आहे.  फटाके घेण्यासाठी आलेले ग्राहक आपले दुचाकी व चारचाकी वाहन रोडावर लावत असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात होतात. सोबत अधिक वेगाने या ठिकाणाहून वाहने वापरतात मात्र फटाक्याच्या दुकानामुळे हावेवर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व बाबीकडे जामनेर तालुक्यातील संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे संबंधित फटाके दुकानदार व गोडावून धारक हे नियमाचे पालन न करतात दुकाने सुरू आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या फटाके दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Protected Content