भुसावळात रन फॉर युनिटी स्पर्धा उत्साहात

भुसावळ, प्रतिनिधी | लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अॅन्ङ रनर्स असोसिएशनतर्फे रन फॉर युनीटीचे आयोजन करण्यात आले. यात ५० हून अधिक महिला व पुरुष धावपटूंनी चार किलोमीटर धावून सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.

 

सकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून धावपटूंनी धावायला सुरुवात केली. याप्रसंगी प्रवीण फालक यांनी सर्व धावपटूंना या ररनचे महत्त्व विशद केले. त्यानंतर जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिर व तेथून परत येऊन पांडुरंग टॉकीज- दगडी पूल- सरदार पटेल पुतळा ते यावल रोडमार्गे पुन्हा मैदान असे चार किलोमीटर अंतर धावून सर्व धावपटूंनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. दरम्यान, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी शहरातील नागरिक व प्रवासी धावपटूंचा उत्साह वाढवीत होते. शहरातील पुतळ्यास पहाटे सर्वप्रथम भुसावळ रनर्स तर्फे माल्यार्पण केल्याबद्दल सरदार पटेल रिक्षा स्टाफचे रिक्षाचालक व परिसरातील नागरिकांनी धावपटूंचे विशेष कौतुक केले. या रनमध्ये पोलीस विभागातील भाऊसाहेब पाटील, संजय भदाने यांची विशेष उपस्थिती होती. या रनचे नेतृत्व पौरवी गरुडे व रिया पुरलकर या बाल धावपटूंनी केले. या रनमध्ये डॉ. नीलिमा नेहेते, डॉ. चारुलता पाटील, पूनम भंगाळे, प्रिया पाटील, संजीवनी लाहोटी, नीलांबरी शिंदे, भावना झा, डॉ. शीतल चोरडिया, कृपा मुलचंदानी, प्रांजली झा, स्नेहल महाजन, मिनी जोसेफ या महिला धावपटूंनी सहभाग नोंदविला. तसेच सन्मित चोरडिया, छोटू गवळी , हर्षल लोखंडे, सारंग चौधरी, माधव गरुडे, संदीप कुमार वर्मा, आनंद सपकाळे, अक्षय नारखेडे, विजय मोहनानी, अमित बत्रा, युवराज परदेशी, रामचंद्र झोपे, मनीष वारके , कैलास काबरा, प्रकाश अटवाणी, राजेंद्र ठाकूर, निर्मल बलके, सुनील सोनगिरे, अखिलेश कनोजिया, सागर मुलचंदानी, विलास पाटील, रंजीत खरारे ,प्रवीण वारके, गणसिंग पाटील, ब्रिजेश लाहोटी, अंकित पोद्दार ,निलेश लाहोटी, श्रीकांत नगरनाईक, महेंद्र पाटील ,प्रवीण पाटील यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

Protected Content