माझ्याविरोधात तक्रार का घेतली? पत्नीसह एकाचा पोलीस स्थानकात धिंगाणा

जळगाव प्रतिनिधी । माझ्याविरोधात तक्रार का घेतली? असे म्हणत रामांनद नगर पोलीस ठाण्यात दाम्पत्याने धिंगाणा घालत पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांचा हात पिरघळून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे पत्नीवर बलात्कारची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका दाम्पत्यावर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी नितेश मिलींद जाधव आणि त्याची पत्नी प्रियंका नितेश जाधव दोन्ही रा. मढी चौक, पिंप्राळा यांच्या विरोधात गोपाळ बारी यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दाखल केली. याचा राग येवून जाधव कुटुंबिय शुक्रवारी ११ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीस ठाण्यात येवून ड्यूटीवर असलेले महिला पोलीस कर्मचारी तथा ठाणे अंमलदार श्रध्दा वासुदेव रामोशी यांना ओरडून सांगत माझ्या विरोधा गोपाळ बारी यांची तक्रार का घेतली असे सांगत, ओढताण करण्यास सुरूवात केली. हे पाहून पोलीस कर्मचारी नितीन अत्तरदे आणि प्रविण वाघ यांनी समजावून सांगत शांततेत फिर्याद सांगा असे सांगितले. ठाणे अंमलदार श्रध्दा रामोशी यांच्याशी ओढताण करत असतांना पोलीस नाईक जितेंद्र तावडे आणि वाहन चालक पो.हे.कॉ वासुदेव मोरे हे धावून आले. यावेळी नितेश जाधव याने पत्नीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत सर्वांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. अशावेळी दोघांना आवरण्याचा प्रयत्न करत असतांना नितेश हा पुन्हा पोलीसांवर धावून आला. यात पो.ना. जितेंद्र तावडे याचा हात पिरघळला. तर ठाणे अंमलदार श्रध्दा रामोशी यांच्यावरही हल्ला करत हाताला दुखापत करत जखमी केले. पत्नीवर बलात्कारची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जाधव दाम्पत्यावर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content