जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयासमोरच आव्हाड यांचा शिवगड हा बंगला आहे. या बंगल्यासमोर या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. या महिलेने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी तिला वेळीस अटकाव केला.

या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिचे नाव तृप्ती निवृत्ती कांबळे असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधीत महिला बीडीडी चाळमधील रहिवासी असल्याची मााहितीसमोर आली आहे. या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने हे कृत्य का केले याचा तपास पोलीस करत आहे.

Protected Content