मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन -अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा इशारा (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेकविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास नवी मुंबई आयुक्त कार्यालय येथे ३ जानेवारी २२ रोजी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

 

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या. यात अंगणवाडी केंद्रांच्या कामाचे ना दुरुस्त झालेले मोबाईल बदलून नवीन मोबाईल देण्यात यावे, पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांवर लादण्यात येऊ नये, जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेटीची रक्कम तातडीने अदा करावी. माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला मिळावा. रद्द केलेली उन्हाळी सुट्टी देण्यात यावी. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहाराची थकीत रक्कम देण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना रजिस्टर भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये, सेवासमाप्ती लाभाची एक रकमी थकीत रक्कम अदा करण्यात यावी. अंगणवाडी सेविका मदतनीसांची रिक्त पदांची भरती करण्यात यावी. कोव्हिड-१९ मुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम अदा करण्यात यावी. चाळीसगाव-२ प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिओ टॅगच्या फोटोची सक्ती बंद करावी. यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक धरणे आंदोलन संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी केले. याश्वितेसाठी मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, चेतना गवळी, आशा जाधव, पुष्पा परदेशी, सुनंदा नेरकर, उज्वला पाटील, रेखा नेरकर, शकुंतला चौधरी, सविता महाजन, शोभा जावरे, संगिता निंभोरे, सरला पाटील, आक्का सपकाळे, बेबी पाटील, रत्ना सोनवणे, साधना पाटील, शुभांगी बोरसे, वंदना पाटील, वंदना कंखरे,नंदा देवरे, सविता वाघ, नीता सुरवाडे, सलमा तडवी यांनी कामकाज पहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/659084312139206

 

Protected Content