कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना – यावल राष्ट्रवादीचा जाहीर निषेध

यावल प्रतिनिधी | कर्नाटक राज्यातील बेंगळुरूमध्ये काही विकृत मनोवृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्याचा निषेध करत तहसीलदार महेश पवार यांना यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अशा विकृतांवर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांची विटंबना करण्याची घटना कर्नाटक राज्यात घडते आणि तेथील सरकार डोळेझाक करते ही घटना दुर्दैवी आहे. अशा विकृत प्रवृत्तीवर तात्काळ कारवाई आवश्यक आहे. या संदर्भातील निवेदन आज यावलचे तहसीलदार महेश पवार यांना प्रा .मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.

भाजपाची सत्ता असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या विटंबनेवरून वादग्रस्त विधान करून देशातील शिवभक्तांच्या भावनांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे या घटनेचे तीव्र निषेध असून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विकृतांवर कठोर शासन करावे अशी मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा .मुकेश येवले , विजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मनियार, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते, राष्ट्रवादीचे बोदडे नाना, कामराज घारू, गुणवंत नीळ, प्रतिभा नीळ, पितांबर महाजन, बापू जासूद, अय्युब खान, दत्त पाटील, नरेंद्र पाटील, भगवान बर्डे उपस्थित होते.

यासह राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निवृत्ती धांडे, अशोक भालेराव, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, विनोद पाटील, फारुख मुंशी, भागवत अटवाल, विजय साळी, नीलिमा धांडे, आरिफ खान, नंदा महाजन, किरण पाटील, मोसिन खान, गणेश तायडे, हितेश गजरे, गोपाल काकडे, दीपक पाटील, विलास येवले, तुषार येवले, सविता चौधरी, ममता आमोदकर, निलेश आमोदकर, मगदूल तडवी, सागर शिंदे, गणेश तायडे, लकडू सिंग बारेला, भूषण खैरे, पवन पाटील, विशाल वाणी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Protected Content