वाघोदा महामार्गावरील पुलाच्या कामात निकृष्ट वाळूचा वापर –

रावेर प्रतिनिधी | बुर-हानपुर-अंकलेश्वर महामार्गावर वाघोदा नजिक पुलाच्या संरक्षणासाठी निकृष्ट र्जाच्या मातीमिक्स वाळूचा वापर करून भिंतीचे काम सुरु असून या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

पुलाचे आतापर्यंतचं झालेल्या कामामध्येदेखील मातीमिक्स वाळू वापरण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रावेर तालुक्यातील वाघोदानजीक बुर-हानपुर-अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या पुलाला मजबूत करण्यासाठी शासनाकडून देखभाल दुरुस्तीतून निधी वापरण्यात आला आहे. यावर सुमारे १८ लाख रुपये खर्च करून महामार्गावर असलेल्या पुलाला सरंक्षक भिंती उभारण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. परंतु या काँक्रीटीकरणात मातीमिक्स वाळू वापरली जात आहे.

यामुळे कामाचा गुणवत्तेचा दर्जा घसरत असून काम निकृष्ट होण्यास कारणीभूत ठरत आहे. याकडे सावर्जनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. एकीकडे उप अभियंता शेख यांच्या सावदा हद्दीत मातीमिक्स निकृष्ट काम सुरू असतांना उप अभियंता हे मुंबईत होते. त्यांना याबद्दल काही माहिती नसल्याचे त्यांनी उत्तर दिले.

चौकशी करून सांगतो: इम्रान शेख

दरम्यान “वाघोदानजीक सुरु असलेल्या पुलाचे संरक्षणाच्या कामात मातीमिक्स वाळू वापरली जात असेल तर चौकशी करून सांगतो. तसेच मला याविषयी माहिती नाही” असे मोघम उत्तर सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता इम्रान शेख यांनी दिले.

Protected Content