खरेदीच्या बहाण्याने दिड लाखाचे मंगळसूत्र लंपास !

 

रावेर : प्रतिनिधी । खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात आलेल्या २ अनोळखी महिलांनी  दुकानदाराला फसवत दिड लाखाचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली .

 यासंदर्भात रावेर पोलीस ठाण्यात नरेंद्र सोनार ( वय 40 ,  व्यवसाय -सराफ दुकान , रा – रावेर ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,  काल दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या श्री महालक्ष्मी अलंकार  ( हेडगेवार चौक रावेर )  या ज्वेलर्स दुकानात २ अनोळखी महिला ग्राहक म्हणून आलाय होत्या . त्यांनी दागिना पसंत करण्याच्या बहाण्याने 1,50,000 रूपये किंमातीचे  38.500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ( काळे मणी लावलेले व त्यावर हालमार्कचे चिन्ह SMA 916 असलेले ) दुकानदाराला फसवून चोरून नेले . फिर्यादी दुकान बंद करताना स्टॉक चेक करीत असताना सोन्याचे मंगळसूत्र कमी असल्याचे लक्षात आल्याने त्याने CcTV फुटेज चेक केले त्यात त्यांनी २ महिला ग्राहक बनून आल्या व त्यांनी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा यांचा विश्वास संपादन करून हात चलाखीने त्यांचा विश्वासघात करून सोन्याची पोतचे स्ट्रे पाहत असताना एक पोत चोरून  नेल्याचे लक्षात आले . या फिर्यादीवरून २ अनोळखी महिलांच्या विरोधात भादवि कलम-406,380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  पुढील तपास  स.पो.नि शितलकुमार नाईक करीत आहेत 

 

Protected Content