अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अपहरण

जळगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार, २८ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी कुटुंबियासह वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तिच्या घरी असताना, तिचे अज्ञात व्यक्तीला तिला काहीतर फूस लावून पळविले, व अल्पवयीन मुलीचे अपहरण केले, अल्पवयीन मुलगी पाच ते सहा तास उलटूनही घरी आली नाही तसेच कुठेच आढळून आली नाही. अखेर मुलीच्या वडीलांनी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.

Protected Content