कापूस खरेदी करून पैसे न देता तीन शेतकऱ्यांची सव्वा सहा लाखांची फसवणूक

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथील तीन शेतकऱ्याचा ७७ क्विंटल कापूस खरेदी करून पैसे न देता परस्पर घेऊन एकूण ६ लाख २१ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवारी २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावात शेतकरी संजय गबरू राठोड, सुरेश राघो चव्हाण आणि ललित सोमा चव्हाण या तीन शेतकरी राहतात. शेतीवर आलेल्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता एका व्यापाऱ्याने या तीनही शेतकऱ्यांकडून ७७ क्विंटल कापूस याची रक्कम ६ लाख २१ हजार रुपये मोजून घेऊन पैसे न देता वाहन घेऊन प्रसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान तीनही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संदर्भात संजय गबरू राठोड (वय-४२) रा. लोंढ्री ता. जामनेर यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.

Protected Content