जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अर्धाकिलो विकलेल्या कैऱ्यांचे पैसे घेतल्याने त्याचे वाईट वाटल्याने एकाने महिलेसह तिच्या पतीला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना शनिवार, २५ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर परिसरात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील संत मिराबाई नगरात शालू अशोक जाधव या पती अशोक किसन जाधव व कुटुंबियासह वास्तव्यास आहेत. २५ मार्च रोजी गुजराल पेट्रोलपंप परिसरात अशोक जाधव यांनी पिंप्राळा पसिरातील मढी चौकात राहणाऱ्या नितेश मिलिंद जाधव याच्याकडून अर्धा किलो विकलेल्या कैऱ्याचे पैसे घेतल्याने या रागातून नितेश जाधव याने अशोक जाधव यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, शालू जाधव या भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही नितेश जाधव याने अश्लिल शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच अशोक जाधव व त्यांच्या पत्नी शालू जाधव या दोघांना नितेश याने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शालू जाधव यांच्या तक्रारीवरुन नितेश मिलिंद जाधव याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहेत.