भयंकर : पत्नीच्या मृत्यूनंतर पतीची आत्महत्या; फेसबुक लाईव्ह करून घेतला निरोप !

जळगाव प्रतिनिधी । आपल्या पत्नीचा विष प्राशनाने मृत्यू झाल्या नंतर एकाने आत्महत्या केल्याची भयंकर घटना आज जळगावात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्येआधी फेसबुक लाईव्ह करून याची माहिती जगाला दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्‍या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज रूळांवर आढळून आला.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले. तर आई-वडिलांसह कुटुंबियांचा निरोप घेत त्याने हे लाईव्ह केले आहे. यानंतर त्याने आत्महत्या केली. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली आहे.

(सविस्तर माहिती लवकरच)

Protected Content